Jalna Districtजालना जिल्हा

ख्रिश्चन समाजाचा मूक मोर्चा

जालना-ख्रिश्चन समाजावर धर्मांतरासंदर्भात होत असलेले आरोप आणि या समाजाच्या धार्मिक कार्यात होणारा हस्तक्षेप टाळण्यात यावा या आणि अन्य मागण्या संदर्भात जालन्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवार दिनांक 31 जानेवारीला अंबड चौफुली येथून निघालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले.

ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. देशात विविध ठिकाणी चर्चमध्ये जाऊन स्त्रियांवर अत्याचार करणे, प्रार्थना स्थळात किंवा धार्मिक विधी मध्ये गोंधळ घालून त्यासोबत धर्मांतराच्या नावाखाली ख्रिश्चन समाजाला वेठीस धरणे, आदि बाबतीत या समाजाला त्रास होत असल्याचेही यावेळी धर्मगुरूंनी सांगितले. त्यासोबत ख्रिश्चन समाज हा मागासलेला असून या समाजातील तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत. मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळ ख्रिश्चन समाजाच्या तरुण-तरुणींचे नोकरी ,उद्योग,व्यवसायासाठी आलेले अर्ज कचऱ्याच्या टोपलीत फेकतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील बहुसंख्य ख्रिश्चन समाज बांधव सहभागी झाले होते.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button