क्रिप्टो करेन्सी; आलिशान गाड्या सह चार जण पोलिसांच्या ताब्यात
जालना- आभासी चालन अर्थात क्रिप्टो करन्सी प्रकरणी दिनांक 16 जानेवारीला Edtv News ने या प्रकरणाच्या घोटाळ्याला वाचा फोडली होती, आणि त्यानंतर राज्यात सुरू झाला होता एकच गोंधळ. जालना तालुका पोलीस ठाण्यात आणि कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.
दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षकांनी तपासाची चक्रे फिरवून काल दिनांक 2 फेब्रुवारी पुणे(चिंचवड) येथून या प्रकरणातील चार संशयिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे दीड कोटींच्या आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत .मात्र या प्रकरणाबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे ,आणि अधिकृत नावे देण्यासही इन्कार केला आहे. परंतु ताब्यात घेतल्याची कबुली देऊन ज्यावेळेस त्यांच्याकडून पूर्ण माहिती उघड होईल त्यावेळेस अधिकृतपणे पोलीस अधीक्षक याविषयी माहिती देणार आहेत असे सांगण्यात आले. सुमारे पाच वाजेच्या सुमारास ही माहिती बाहेर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या आहेत यापूर्वीच्या बातम्यांची लिंक.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com