Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी मध्ये फसवणूक; 3 कोटी44 लाखांचे व्यवहार गोठवले;हे पकडले आरोपी; पाच कोटी 88 लाखांचे व्यवहार

जालना- क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक केलेल्यांना दरमहा 11 टक्के रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण खरात व त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 16 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला होता, आणि त्यावेळेस पासून आर्थिक शाखेच्या वतीने या करन्सी मध्ये असलेले प्रमोटर आणि गुंतवणूकदार यांच्या चौकशा चालू होत्या.

दरम्यान ही फसवणूक मोठ्या प्रमाणात असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्यानंतर आर्थिक गुन्हा शाखेने फास आवळण्यास सुरुवात केली आणि 116 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले. त्यामध्ये दोन कोटी 69 लाख रुपयांची प्रथमदर्शनी फसवणूक झाल्याचे आर्थिक गुन्हा शाखेच्या समोर आली आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास करत असताना प्रमोटरांनी वापरलेली वेबसाईटच बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक गुन्हा शाखेने फास आवळले. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तसेच गुजरात येथे या क्रिप्टो करन्सी मधील प्रमोटर्स असल्याचे कळाले. त्या -त्या अनुषंगाने गुन्हे आर्थिक शाखेचे दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी पुणे येथे या आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन लॅपटॉप, तीन संगणक, नऊ महागडे मोबाईल, तसेच फसवणूक करून मिळविलेल्या रकमेमधून खरेदी केलेल्या चार महागड्या गाड्याही जप्त केल्या आहेत. या सर्वांची अंदाजे किंमत दोन कोटी 44 लाख रुपये आहे.

दरम्यान या आरोपींच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांची तपासणी केली असता 3 कोटी 44 लाख रुपये एवढी रक्कम बँक खात्यामध्ये गोठविण्यात आली आहे. या आरोपींमध्ये इरफान मुद्दिन सय्यद वय 45, वेंकटेश दशरथ भोई वय 30, रमेश बाबुराव उत्तेकर वय 53 ,आणि अमोध वसंत मेहतर वय 48 या चार आरोपींचा समावेश आहे. आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस उपाधीक्षक बी.डी फुंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस नायक फुलसिंग घुसिंगे, मंगला लोणकर, श्रीकृष्ण आडेप, ज्ञानेश्वर खराडे, सागर बाविस्कर, गोपाळ गोशिक, संभाजी तनपुरे यांनी या तपासासाठी प्रयत्न केले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button