क्रिप्टो करेंसी प्रकरण; “त्या” चार आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी
जालना -बनावट वेबसाईट तयार करून क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलनाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल दिनांक तीन रोजी पुणे येथून चार आरोपींना ताब्यात घेतले होते.आणि चौकशी केल्यानंतर त्यांना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अटकही केली होती .अटक केल्यानंतर त्यांचा मुक्काम सदर बाजार पोलीस ठाण्यातील कोठडीत झाला .
आज पुन्हा त्यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात आणून सखोल चौकशी केली. या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी सय्यद इरफान, व्यंकटेश भोई, रमेश उत्तेकर, अमोद मेहतर, या चौघांनाही न्यायालयासमोर हजर केले. सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास यांना न्यायालयात आणल्यानंतर पाचवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. जी. आडके यांनी या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .दिनांक आठ रोजी पुन्हा या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
आर्थिक शाखेच्या पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानुसार या चौघांकडून सुमारे तीन कोटी 44 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले .त्यामुळे पोलिसांनी यांच्या नातेवाईकांसह बँक खाते गोठविले आहेत .दोन कोटी 44 लाख रुपयांच्या आलिशान गाड्याही त्यांनी या पैशातून खरेदी केलेल्या आहेत .असा एकूण पाच कोटी 88 लाख रुपयांचा फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
क्रिप्टो करेंसी विषयीच्या या पूर्वीच्या सविस्तर बातम्या पाहण्यासाठी लॉगिन कराwww.Edtvjalna.comकिंवा प्ले स्टोर वरूनEdtv jalna हे ॲप डाऊनलोड करा
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com