1.
Jalna Districtजालना जिल्हा

336 गावांच्या वॉटर ग्रीडला तत्वता मान्यता; माजी मंत्री खोतकर आणि आ.कुचे यांची संयुक्त पत्रकार परिषद

जालना- पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जालना आणि बदनापूर तालुक्यातील सर्व गावे, तसेच अंबड आणि भोकरदन मतदारसंघातील काही गावांचा समावेश करून एकूण 336 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर ग्रीडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वता मान्यता दिल्याची माहिती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर तथा बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे नेते भास्कर दानवे यांचीही उपस्थिती होती. पुढील पंधरा दिवसांमध्ये या वॉटर ग्रीड संदर्भातील आराखडा सादर करण्याच्या सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिल्या असल्याचेही या दोघांनी सांगितले.

दरम्यान किती खर्च येईल हे अद्याप सांगता येणे कठीण असले तरी या वॉटर ग्रीड वर होणारा खर्च अर्धा केंद्र सरकार आणि अर्धा राज्य सरकार करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button