क्रिप्टो करेंसी प्रकरण; आता पुढे काय होऊ शकतं?
जालना -क्रिप्टो करेंसी म्हणजेच आभासी चलन, ज्याला जीडीसी( गोल्ड डिजिटल कॉइन) नावाने देखील आता संबोधल्या जात आहे. अशा या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्या प्रकरणी जीडीसीचे प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी दीप्ती खरात यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 16 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर पोलिसांच्या हाती या पती-पत्नीची जोडी लागली नाही? का पोलिसांना या दोघांना अटक करायची नव्हती? हा एक वेगळा विषय आहे. कारण जर या दोघांना ताब्यात घेतले असते तर पुढील आरोपी सापडले नसते. असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, आणि कोण कोण गुंतलं आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणात दाखल असलेल्या दोन मुख्य आरोपींसह इतर काही आरोपींचा तपास घेणे सुरू केले. आणि त्यांच्या हाती लागले ते पुणे इथून चार मुख्य सूत्रधार, सय्यद इरफान, व्यंकटेश भोई, रमेश उत्तेकर, आणि अमोद मेहता, या चौघांनाही शुक्रवार दिनांक तीन रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जालन्यात आणले. प्राथमिक चौकशी करून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांना अटक केली. आणि शनिवार दिनांक चार रोजी न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्यांना दिनांक 8 फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती पाहता दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये जर पोलिसांना आवश्यक असणारी माहिती हाती लागली नाही किंवा मिळालेल्या माहिती मधून या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असेल तर आठ तारखेला न्यायालयात या आरोपींना उभे केल्यानंतर पोलीस पुन्हा पाच दिवस पोलीस कोठडीवाढवून मागण्याची शक्यता प्रभारी जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी व्यक्त केली आहे. सरकारतर्फे विधिज्ञ म्हणून बाबासाहेब इंगळे यांची यांनी काम पाहिले आहे. काल न्यायालयात देखील त्यांनीच युक्तिवाद केला. त्या संदर्भात “ईडी टीव्ही” ने आज त्यांच्याकडून विशेष माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रमोटर्सनी करोडो रुपयांची स्वप्न दाखवून आलिशान हॉटेलमध्ये सेमिनार घेतले, या सेमिनारला उपस्थित असलेल्या गुंतवणूकदारांवर देखील कारवाई होईल का? या प्रश्नाला उत्तर देताना विधीज्ञ श्री. इंगळे म्हणाले की ,पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना जर काही संशय आला किंवा कोणी तक्रार केली तर अशा व्यक्तींची चौकशी करून पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू शकतात, परंतु केवळ सेमिनारला गेले म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता कमी असल्याचेही श्री इंगळे यांनी म्हटले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com