गॅस सिलेंडर का गॅस शेगडी? मर्चंट बँकेच्या निवडणुकीत अवघे 47 टक्के मतदान
जालना -मोतीराम अग्रवाल मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात टक्केवारी घसरल्यामुळे शेगडी शिवाय गॅसचा आणि गॅस शिवाय शेगडी चा काय उपयोग? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या सन 2023 ते 28 च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे उमेदवारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे .एकूण सात हजार 887 मतदार होते, आणि मतदानाची टक्केवारी फक्त 47%च आहे त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मोतीराम अग्रवाल यांच्या गटाचे मोतीरामजी अग्रवाल विकास पॅनल होते आणि निशाणी गॅस सिलेंडर होती तर दुसरे पॅनल व्यापारी एकता पॅनल होते आणि गॅसशेगडी ही निशाणी होती. दरम्यान मोतीराम अग्रवाल विकास पॅनलचे यापूर्वीच डॉ. संजय राख मोहन शिंनगारे, मधुसूदन मुत्याल ,सौ. मीनाक्षी दाड, सौ. उज्वला मिसाळ, हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. जालना शहरात 13 ठिकाणी आणि इतर सहा ठिकाणी अशा एकूण 19 ठिकाणावर रविवारी मतदान पार पडले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com