GDCC प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
जालना-GDCC (गोल्ड डिजिटल कॅश कॉईन) म्हणजेच क्रिप्टो करेंसी प्रकरणी आर्थिक गुन्हेच्या शाखेच्या ताब्यात असलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
16 जानेवारीला तालुका जालना पोलीस ठाण्यात जीडीसी म्हणजेच क्रिप्टो करन्सी प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात यांच्यासह इतर काही आरोपी होते या प्रकरणाचा तपास उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. ही फसवणूक कोट्यावधी रुपयांची असल्याचे लक्षात आल्यानंतर या शाखेने दिनांक तीन रोजी पुणे येथून चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यामध्ये अमोद वसंतराव मेहतर, सय्यद मोईद्दीन सय्यद, वेंकटेश दशरथ भोई, आणि रमेश बाबुराव उत्तेकर यांचा समावेश आहे.
या चौघांनाही न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसाची म्हणजे दिनांक आठ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा या चारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. आता या पोलीस कोठडीची मुदत दहा तारखेला संपणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रभारी जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com