मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही त्यापूर्वीच सरकार पडेल:माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे भाकीत
जालना- गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या शिंदे गटावर होत असलेला गद्दारांचा आरोप आज पुन्हा एकदा माजी मंत्री आदित्य रश्मी उद्धव ठाकरे यांनी जालना तालुक्यातील रामनगर येथे झालेल्या जाहीर सभेत केला.
त्यासोबत मुख्यमंत्री घटनाबाह्य असून गद्दारांची गॅंग असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही त्यापूर्वीच हे सरकार पडेल असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, युवा सेनेचे शिवा शेजुळ, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. ठाकरे म्हणाले की या 40 लोकांना मंत्री पदाचे आश्वासने देऊन फोडाफोडी केली आहे. प्रत्यक्षात मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल आणि या 40 आमदारांना मंत्रिपद द्यायचे असेल तर अन्य राज्यांमध्ये त्यांना पाठवावे लागेल, कारण एवढी मंत्रिपदे महाराष्ट्रात तरी नाहीत .कोणाला कितीही टोल नाके दिले तरी विधानभवनाची पायरी आपण त्यांना चढू देणार नाहीत, त्यापूर्वीच हे सरकार पडणार आहे, मी काय बोलतो ते लिहून ठेवा माझे नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे असे आवाहनही त्यांनी केले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव सत्तार नाहीतर गद्दार आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची सोडून ते जिल्हाधिकाऱ्यांना घेतली का? कोणती घेता? एवढेच विचारत फिरत असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com