GDCC प्रकरण; आणखी दोन बीएमडब्ल्यू गाड्या जप्त
जालना-GDCC ( गोल्ड डिजिटल कॅश कॉइन) म्हणजेच क्रिप्टो करन्सी या प्रकरणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. या शाखेच्या पोलिसांनी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आरोपींकडून चार आलिशान चार चाकी गाड्या जप्त केल्या होत्या. त्यासोबत या आरोपींना आतापर्यंत एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी ही न्यायालयाने सुनावली होती .या प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेने आरोपींच्या भोवतीचे फास आवळायला सुरुवात केली आहे, आणि तपासात प्रगती दाखवत आज पुन्हा दोन आलिशान म्हणजेच बीएमडब्ल्यू या गाड्या जप्त केल्या आहेत. एक गाडी औरंगाबाद येथून आणि दुसरी गाडी पुणे येथून जप्त करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून जप्त केलेल्या बीएमडब्ल्यू या गाडीचा क्रमांक एम. एच. 14 के बी 2777 आहे. ती सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालय समोर उभी आहे.
एक गाडी औरंगाबाद येथून आणि दुसरी गाडी पुणे येथून जप्त करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून जप्त केलेल्या बीएमडब्ल्यू या गाडीचा क्रमांक एम. एच. 14 के बी 2777 आहे. ती सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर उभी आहे. तर दुसरी एम एच 46 बी ए 2002 ही पुण्याहून जालन्यात येण्यासाठी निघालेली आहे. आता एकूण जप्त केलेल्या गाड्यांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सध्या आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी उपाधीक्षक ज्ञानेश्वर पायघन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते हे करत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com