Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आयजी साहेबांच्या तिसऱ्या” दरबारात” पोलिसांच्या समस्या सुटतील ?

जालना- औरंगाबाद परिक्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, आणि विविध पोलीस ठाण्यांची तपासणी करत आहेत.उद्या शुक्रवार दिनांक दहा रोजी पहाटे ते पोलिसांची कवायत देखील तपासणार आहेत. त्यानंतर पोलिसांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी” दरबार” भरणार आहे.

आयजी साहेबांचा हा तिसरा दरबार आहे या दरबारामध्ये पोलिसांच्या कामकाजाविषयीच्या अडीअडचणी सर्वांसमक्ष मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या वसाहतीचा मोठा प्रश्न सुटलेला नाही. पोलीस कवायत मैदान, पोलीस अधीक्षक कार्यालय, आणि एकूणच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अडीचशे 100 आणि 50 अशा तीन टप्प्यांमध्ये सुमारे चारशे निवासस्थाने आहेत. निवासस्थानांची बिकट परिस्थिती आहे मुलांच्या खेळाच्या मैदानाचा तर विचारच न केलेला बरा. तुटलेल्या खेळण्या आणि मोठमोठ्या दगडांनी हे मैदान व्यापलेलं आहे. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे या वसाहतीकडे जाणारा रस्ता! याच रस्त्यावर पोलिसांच्या वाहनांचे देखभाल दुरुस्ती करणारे परिवहन कार्यालय आहे, भोजनालय आहे, आयुध कार्यशाळा, आहे आणि संकटाच्या वेळी पोलिसांना मदत करणाऱ्या श्वानपथकाचे देखील कार्यालय इथेच आहे. असे असतानाही या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. आजारी माणूस या रस्त्याने दवाखान्यात जायलाच भीत आहे कारण दवाखान्यापर्यंत या तो पोहोचेलच याचा नेम नाही. त्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून निवासस्थानांना अधिकृत वीज पुरवठाच नाही, त्यामुळे नाविलाजाने का होईना इथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आकडा टाकून वीज वापरावी लागत आहे. त्यामुळे वीज मंडळाचे लाखो रुपये तर बुडतच आहेत परंतु जे कर्मचारी राहत आहेत त्यांना देखील वीज चोरी करून वापरावी लागत असल्यामुळे मनस्तापही सहन करावा लागत आहे.

जिथपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांचे येणे- जाणे आहे ती हद्द म्हणजे पोलीस कवायत मैदान. इथपर्यंत चांगल्या स्थितीतला सिमेंटचा रस्ता मागील वर्षी तयार करण्यात आला मात्र त्यापुढे सुरू होतो तो खड्डेमय, यातनामय, आणि माणसांसह वाहनांना खिळखिळा करणारा रस्ता. पोलीस कर्मचाऱ्यांचा तर खर्च वाढतच आहे मात्र सरकारी वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा ही खर्च यामुळे वाढला आहे. निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्ती पेक्षा किमान हा रस्ता तरी दुरुस्त करावा अशी माफक अपेक्षा या निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. परंतु वरिष्ठांसमोर बोलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे अनेकांनी हा प्रश्न पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांना “ईडीटीव्हीच्या” माध्यमातून विचारावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button