GDC प्रकरण; फरार आरोपी किरण खरात च्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी लांबली; ताब्यातील त्या आरोपींची पोलीस कोठडी वाढली
जालना-GDC- म्हणजे स्क्रिप्टो करेन्सी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान याच प्रकरणात फरार असलेले आरोपी किरण खरात आणि सौ. दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबली असून आता दिनांक 17 रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे.
GDC( क्रिप्टो करेंसी) फसवणूक प्रकरणात तीन तारखेला आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यांना चार तारखेला न्यायालयासमोर हजर केले असता पाचवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.आडके. यांनी आठ तारखेपर्यंत पहिली पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस तपासात प्रगती दिसल्यामुळे न्यायालयाने आठ तारखेला पुन्हा आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली. त्यामुळे दहा तारखेपर्यंत सय्यद इरफान, व्यंकटेश भोई, रमेश उत्तेकर ,अमोद मेहतर, हे चार आरोपी पोलीस कोठडीत होते.
आज दिनांक 10 रोजी पुन्हा या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.सरकारच्यावतीने प्रभारी सरकारी अभियोक्ता बाळासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com