Jalna Districtजालना जिल्हाराज्य

संगीत रसिकांसाठी पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची मेजवानी; दि 12 आणि 13 रोजी आयोजन

जालना- कला श्री संगीत मंडळ पुणे, संस्कृती मंच जालना ,आणि व्हायोलिन अकादमी पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 आणि 13 फेब्रुवारीला जालन्यात “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या संगीत महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे.

जुन्या जालन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता संगीत आणि गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळी हे सूर आळवणार आहेत. गायनामध्ये सौ. मानसी देशपांडे कुलकर्णी, पंडित सुधाकर चव्हाण, उस्ताद अर्षद आली हे आपली कला सादर करणार आहेत. रविवार दिनांक 12 रोजी सौ मानसी देशपांडे कुलकर्णी आणि उस्ताद हर्षद अली यांचं गायन रईस व हाफिज बालेखन यांच्या सतार जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक 13 फेब्रुवारीला पंडित सुधाकर चव्हाण यांचे गायन तेजस उपाध्ये व्हायोलिन वादन आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलिन आणि पंडित रणू मुजुमदार यांच्या बासरी मध्ये जुगलबंदी रंगणार आहे. संगीत रसिकांनी हजेरी लावून आपल्या संगीताची तहान भागवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मा.कृष्णराव फुलंब्रीकर, प.गोविंद जळगावकर, अप्पा जळगावकर,यांचा वारसा लाभलेल्या जालना शहरात शास्त्रीय संगीताचा स्वरनाद घुमणार आहे.या पूर्वी विराज जोशी (पं.भीमसेन जोशी यांचे नातू),अंकिता जोशी, स्वामी शिवानंद, पं.सुधाकर चव्हाण, रईस खान,डाॅ.जयश्री प्रभु इत्यादि नामवंत कलाकारांनी आपली गायन, वादन सेवा जालनेकरांना रुजू केली आहे.

कलाकारांची खासियत
पहिला दिवस, भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सव अंतर्गत, सौ.मानसी देशपांडे कुलकर्णी, युवा गायिका, धारवाडचे सितार वादक खान बंधु (प्रसिद्ध सितार वादक बाले खान यांची सातवी पिढी), यांची सितार जुगलबंदी.वयाच्या आठव्या वर्षी ज्यांनी सवाई गंधर्व महोत्सवात गायन केले, व स्वतः पं.भीमसेन यांनी कडेवर घेऊन सभागृहात मिरविले असे कलकत्ता वासी, ऊ.करीमखाॅ यांचे नातू अर्षद अली, आपली गायन सेवा रुजू करतील.
दुसरा दिवस
स्वर झंकार महोत्सव अंतर्गत ,कलाश्री संगीत मंडळ, पुणे, चे संस्थापक व या महोत्सवाचे प्रवर्तक पं.सुधाकर चव्हाण, पुण्यातील व्हायोलिन ॲकेडमी चे तेजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन होणार आहे.
समारोप पं.अतुल कुमार उपाध्ये व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे , प्रसिद्ध बांसरी वादक पं.रोणु मुजुमदार यांचे व्हायोलिन व बांसरी जुगलबंदीने होणार आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button