Jalna Districtजालना जिल्हाराज्य

जालना- औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रॅव्हल्सचा पहाटे अपघात

जालना-प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खाजगी बसचा आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जालना- संभाजीनगर महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

दरम्यान या दोन्ही बसमधील प्रवाशांना त्या-त्या बसच्या व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था करून नियोजित ठिकाणी पोहोचविले आहे. हरिओम ट्रॅव्हल्स ची पुणे अमरावती एमएच २७ बी एफ 87 87 ही बस सायंकाळी सहा वाजता पुणे येथून निघाली होती. बसचे चालक दिलीप वाघमारे आणि सहचालक मनोज दिगंबर चौधरी हे 30 प्रवासी घेऊन अमरावती कडे निघाले होते, तर नागपूर वरून रात्री आठ वाजता एम एच 40 बी एल 71 61 ही सयनी ट्रॅव्हल्सची बस 30 प्रवासी घेऊन नरेंद्र गव्हाळे हे चालक निघाले होते. पुण्याकडे जाणारी ही बस समृद्धी महामार्गावरून जालन्यातील औद्योगिक वसाहत मार्गे संभाजीनगर रस्त्याकडे वळत होती. त्याच दरम्यान संभाजीनगर कडून येत असलेल्या हरिओम ट्रॅव्हल्सच्या बसने या सयनि बसला धडक दिली. यामध्ये दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही .दरम्यान बस मधील दोन जखमी विद्यार्थिनींना सामान्य रुग्णालयात आणले होते मात्र त्यांनी प्रथमोपचार घेऊन घरी जाणे पसंत केले. पहाटेच झालेल्या या अपघातातील जखमींना चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र तागवाले आणि श्री. हिवाळे यांनी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी मदत केली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button