मोतीबाग चौपाटीवर बोलोरो दुचाकीच्या अपघातात ;एक जण ठार; तीन जण गंभीर जखमी
जालना- संभाजीनगर चौफुली वरून जालना शहरात येत असलेल्या बोलेरो चार चाकी वाहनाने दुचाकी स्वराला धडक दिली, यामध्ये जालना तालुक्यातील बठाण येथील ऋषिकेश रामदास शिरसाट वय40 यांचा मृत्यू झाला आहे .बोलेरो क्रमांक एम.एच. 45-एन 13 83 हे वाहन घेऊन सात वाजेच्या सुमारास विकास तिवारी हे चालक जालना कडे येत होते. मोतीबाग चौपाटी जवळ मोटरसायकलवर असलेल्या ऋषिकेश रामदास शिरसाट वय 40 त्यांची पत्नी राधा ऋषिकेश शिरसाट35, आणि मुलगी अर्चना ऋषिकेश शिरसाट10, हे तिघेजण रस्ता ओलांडत असतांना बोलोरोची त्यांना धडक बसली आणि त्यामध्ये हे तिघेही इतरत्र फेकला गेले. त्यामध्ये ऋषिकेश शिरसाठ यांच्या डोक्याला चांगलाच मार लागला आहे. या तिघांनाही सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी ऋषिकेश शिरसाठ यांना मृत म्हणून घोषित केले आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर हे घटनास्थळावर हजर झाले आणि वाहतूक सुरळीत करून दिली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे या परिसरात मोठी गर्दी झालेली होती. बोलेरो ही दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला गेलेली दिसत आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com