GDC प्रकरण- आणखी दोन आलिशान गाड्या जप्त ; जप्त गाड्यांची एकूण संख्या झाली आठ
जालना-GDC गोल्ड डिजिटल कॉइन म्हणजेच क्रिप्टो करेंसी प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आणखी दोन गाड्या जप्त केल्या आहेत त्यामुळे .आता जप्त केलेल्या एकूण गाड्यांची संख्या आता आठ झाली आहे.
एखाद्या शोरूम मध्ये देखील एवढ्या गाड्या उपलब्ध नसतील अशा आलिशान बीएमडब्ल्यू, जॅकवायर, मर्सिडीज, अशा उच्च प्रतीच्या आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या या गाड्या जेडीसी प्रकरणात प्रमोटर वापरत होते. 3 तारखेला आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सुरुवातीला चार गाड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर दिनांक नऊ रोजी पुन्हा दोन गाड्या जप्त केल्या आणि आज रविवार दिनांक 12 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आणखी दोन आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. पोलीस तपासामध्ये आरोपींकडे गाड्या असल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषंगाने तपाशी अधिकाऱ्यांनी या गाड्या चालकांच्या हाताने इचलकरंजी येथून बोलावून घेतल्या आणि जप्त केल्या. दरम्यान आज जप्त केलेल्या गाड्यांचा क्रमांक एम. एच. 12 यु एल 77 77 आणि एम.एच 09 एफ क्यू 77 77 असा आहे. दरम्यान या दोन्ही गाड्या इचलकरंजी येथील प्रमोटर अमोध मेहतर यांच्या नावावर असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात सध्या पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपींची दोन वेळा पोलीस कोठडी वाढवून मिळाली होती आणि आता पुन्हा उद्या या आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यावेळी तपासामध्ये प्रगती असून आरोपींकडून आणखी दोन गाड्या जप्त केल्याचे सांगत पोलीस न्यायालयाला या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ करून मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक ज्ञानेश्वर पायघन
आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com