भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा आज समारोप
जालना- कलाश्री संगीत मंडळ पुणे, संस्कृती मंच जालना ,आणि व्हायोलिन अकादमी पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 आणि 13 फेब्रुवारीला जालन्यात “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव” आयोजित करण्यात सुरू आहे. या संगीत महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे.
जुन्या जालन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता संगीत आणि गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळी हे सूर आळवत आहेत. रविवारी पहिल्या दिवशी गायनामध्ये सौ. मानसी देशपांडे कुलकर्णी आणि उस्ताद हर्षद अली यांचं गायन, रईस व हाफिज बालेखन यांच्या सतार जुगलबंदीचा कार्यक्रम झाला. सौ देशपांडे यांना तानपुऱ्यावर कु. अंजली काजळकर तबल्यावर निलेश रणदिवे, हार्मोनियम वर स्वरूप देशपांडे यांनी साथ संगत दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शर्वरी देशपांडे यांनी केले.
आज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारीला पंडित सुधाकर चव्हाण यांचे गायन तेजस उपाध्ये व्हायोलिन वादन आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलिन आणि पंडित रणू मुजुमदार यांच्या बासरी मध्ये जुगलबंदी रंगणार आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com