Jalna Districtजालना जिल्हा

संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा; कुमारिका पूजनाने देवी भागवताचा समारोप

जालना- संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा आज प्रगट दिन. या दिनाच्या निमित्ताने रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. ह.भ.प. राहुल महाराज जोशी यांच्या वाणीतून श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.

रोज सकाळ संध्याकाळ महाप्रसाद, हरिकीर्तन, हरिपाठ, काकडा, असे विविध धार्मिक कार्यक्रम इथे पार पडले. आज देवी भागवताचाही समारोप झाला. या समारोपाचा निमित्ताने कुमारीका पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. दुपारी बारा वाजता गणगण गणात बोते च्या जयघोषात गुलालाची उधळण करत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी दिनांक 10 रोजी ह. भ.प.डॉ. आनंदगडकर महाराज यांच्या हस्ते या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमही उत्साहात पार पडला. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले हे उत्सव पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव आर्दड, सचिव संपतराव पाटील,अरूण मगरे, दिगंबरराव पळसकर, सोपानराव लोखंडे, रामकिसन बदर, भगवानराव भाकरे, रमाकांत पिंपळे, श्रीपत खरात, श्रीमंत जऱ्हाड, मधुकर बिंन्नीवाले, अरुण देशपांडे, नारायण मोताळे, पद्माकर शिंदे,मुरलीधर लांडे,श्रीराम जुनगडे, संतोष जोशी, रमेश रकटे,किशोर बिन्नीवाले, किसन लोखंडे, चंद्रकांत पिंपळे, किशोर खैरे,दत्तात्रय काटे,उमेश देशमुख, केशव पंचभैय्ये,सुभाष गाजरे, संभेराव, विनोद चौबे, किशोर खैरे, टिल्लू पाटील, सचिन बोर्डे ,जिगे छत्रबंद, यांच्यासह महिला महिलांनी परीश्रम घेतले.


मंगळवारी सकाळी पालखी, वैराग्यमूर्ती ह. भ .प .भगवान महाराज आनंदगडकर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button