GDC प्रकरण- आत्तापर्यंत 20 कोटी 81 लाखांच्या मालमत्तेला सील; आरोपींच्या कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ
जालना -GDC जीडीसी गोल्ड डिजिटल कॉइन( क्रिप्टो करेंसी) प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या ताब्यात असलेल्या पुणे येथील चार आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासात प्रगती दाखवत आज पुन्हा एकदा या आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यामुळे या आरोपींचा पोलीस कोठडीतील चार दिवसांचा मुक्काम वाढला आहे.
16 जानेवारीला तालुका जालना पोलीस ठाण्यातGDC( क्रिप्टो करन्सी) मध्ये फसवणूक झाल्या प्रकरणी प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर या पोलिसांनी दिनांक 3 फेब्रुवारीला पुणे येथून चार आरोपींना ताब्यात घेऊन चार आलिशान गाड्यांसह जालनात आणले होते. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोन वेळा पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे .आता पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे .दरम्यान सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करीत असताना पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना सांगितले की, तपासामध्ये प्रगती आहे आणि या फसवणुकीची व्याप्ती खूप मोठी आहे. तपासामध्ये प्रगती असून आणखी माहिती बाकी घेणे आहे .त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून मिळावी तसेच सुमारे साडेतीन कोटींच्या फसवणुकीच्या गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आत्तापर्यंत सुमारे 130 साक्षीदारांचे अर्ज गुन्हे आर्थिक शाखेकडे आलेले आहेत त्यापैकी 20 साक्षीदारांनी आपल्या साक्षी नोंदविलेल्या आहेत. तसेच या फसवणुकीची व्याप्ती पाहता आरोपींच्या बारा कोटींच्या मालमत्ता या सील करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये घर, शेती, अशा प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे तर आठ कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आलिशान गाड्या, सोने ,चांदी, आदींचा समावेश आहे. दरम्यान आरोपींच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की पोलीस प्रशासन वारंवार पहिलाच तपास प्रगतीपथावर असल्याचे सांगत आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागत आहे आणि फसवणुकीचा जेवढा गुन्हा दाखल झाला आहे त्यापेक्षा पाचपट रकमेची जप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींना आता पोलीस कोठडी वाढवून देऊ नये.दोन्ही युक्तिवाद पाहता तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com