1.
Jalna Districtजालना जिल्हा

प्रियसीच्या छळाला कंटाळून विवाहित प्रियकराची आत्महत्या ;दोन महिन्यानंतर गुन्हा उघडकीस

जालना- एकाच कार्यालयात सहकारी म्हणून काम करत असलेल्या विवाहित पुरुषासोबत अविवाहित तरुणीचे प्रेम संबंध जुळले आणि यामधून प्रियसी आणि तिची आई दोघे मिळून प्रियकराला वेगवेगळ्या मार्गाने छळू लागले. या प्रकाराला कंटाळून प्रियकाराने दोन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. टेंभुर्णी येथील समाधान हरिभाऊ उखंडे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचा दोन महिन्यानंतर पोलिसांनी छडा लावला आणि व्हॅलेंटाईन डे, या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवशीच या प्रियसी वर गुन्हा दाखल झाला.

चंदंनजिरा परिसरात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात समाधान हरिभाऊ उखंडे आणि राधिका चांदुरकर हे दोघे ऑपरेटर म्हणून कार्यरत होते .या दरम्यान त्यांचे प्रेम संबंध जुळले. बरेच दिवस हे प्रकरण चालू होते समाधान उखंडे हा विवाहित होता ,त्यामुळे प्रियसी राधिका चांदुरकर हिने तिच्या आईच्या मदतीने समाधान लोखंडे याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देणे, धमकावणे सुरू केले या सर्व प्रकाराला कंटाळून समाधान उखंडे याने सिंदखेड राजा चौफुली परिसरात असलेल्या कनकेश्वर मंदिराच्या परिसरातील झाडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली .पहाटेच्या सुमारास ही आत्महत्या केल्यामुळे बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनीही अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंद केला होता. दरम्यान याप्रकरणी समाधान चा भाऊ संतोष हरिभाऊ लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली या बीटचे कर्मचारी पोलीस श्री. जारवाल आणि श्री. झोटे यांनी या तपासाला सुरुवात केली. तपासा दरम्यान राधिका चांदुरकर व तिची आई वारंवार छळ करत असल्यामुळे समाधान लोखंडे यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 306, आत्महत्याला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अद्याप अटक नाही.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button