कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी लेखापालाला शासनाची 50 लाखांची मदत
जालना- कोरोना होऊन मृत्यू पावलेल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कंत्राटी लेखापाल स्वर्गीय राजेंद्र पंढरीनाथ मिरगे यांच्या परिवाराला शासनाने 50 लाख रुपयांची भरीव मदत केली आहे.
या मदतीचा धनादेश राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे माजी संचालक मनोज देशमुख यांच्या हस्ते नुकताच सुपूर्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे इमारतीत असलेल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प म्हणजेच इंडस ,येथे गेल्या 18 वर्षांपासून स्वर्गीय मिरगे हे कार्यरत होते .11 ऑगस्ट 2020 रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि 21 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला .दरम्यानच्या काळात ते कार्यरत असताना सन 2017 पासून त्यांना आठवड्यातून दोन वेळेस डायलिसिस लागायचे. अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु या प्रकल्पाचे माजी संचालक मनोज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे त्यांनी. केलेल्या पाठपुरावाला तेवढाच प्रतिसाद तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देऊन शासन दरबारी स्वर्गीय मिरगे यांची कैफियत मांडली आणि या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाले आज हा धनादेश सुपूर्त करताना स्वर्गीय राजेंद्र मिरगे यांची पत्नी श्रीमती अंजना मिरगे आई श्रीमती महानंदाबाई मिरगे यांची उपस्थिती होती. स्वर्गीय मिरगे यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com