GDCC प्रकरण- न्यायालयात हजर करण्यापूर्वी आरोपींचे घेतले ठसे; किरण खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 22 रोजी सुनावणी
जालना- जीडीसी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या चारही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले होते. 14 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने आज त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याच प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात व सौ. दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता बुधवार दिनांक 22 रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान या चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. कारण मूळ गुन्हा इथेच दाखल झालेला आहे .त्या अनुषंगाने या आरोपींचे ठसे घेण्यात आले आहेत. हे ठसे म्हणजे पोलीस तपासातील एक महत्त्वाचा पुरावा असल्याचे मानले जाते.
आता पुढे काय?
पुणे इथून आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या चार आरोपींकडून आठ आलिशान चार चाकी वाहनांसह सोने ,चांदी, रोख रक्कम आणि अन्य मालमत्ता अशी सुमारे 20 कोटी 81 लाखांची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने गोठवलेली आहे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता या आरोपींना बाहेर आणण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज करावा लागेल. आणि त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असताना पोलिसांचाही अभिप्राय मागविला जाईल. पोलिसांनी जर या आरोपींच्या जामिनाला विरोध केला तर न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा मुक्काम वाढू शकतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तथा प्रभारी उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर पायघन हे करीत आहेत न्यायालयामध्ये सरकार पक्षाच्या वतीने प्रभारी सरकारी अभियंता बाबासाहेब इंगळे यांनी बाजू मांडली.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com