पाच वर्षात 652 ओपन हार्ट सर्जरी -डॉ. संजय राख यांची माहिती
जालना -शहरातील जुना जालन्यात असलेल्या दीपक हॉस्पिटल येथे गेल्या पाच वर्षात 652 ओपन हार्ट सर्जरी झाल्याची माहिती या हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. संजय राख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या हॉस्पिटलमध्ये 17 फेब्रुवारी 2018 रोजी पहिली ओपन हार्ट बायपास सर्जरी यशस्वी पार पडली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत हृदयाशी असलेल्या एकूणच शस्त्रक्रियाआणि उपचाराविषयी माहिती देताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्डियाक सर्जन डॉ. महेश केदार, भूलतज्ञ डॉक्टर मनोज मिसाळ, बालरोग तज्ञ डॉ. अनुराधा राख, डॉ. सानप, परिचारिका संगीता खाडे, ज्ञानेश्वर लहाने आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. राख म्हणाले की, या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असल्यामुळे सर्वसामान्याला अशक्य असणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत केल्या जात आहेत. 2008 मध्ये हृदयाशी संबंधित असलेल्या अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, या सुविधांना सुरुवात झाली आणि हळूहळू आता ओपन हार्ट सर्जरी देखील मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या आहेत .यामध्ये विशेष म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये केवळ1.2 एवढीच टक्केवारी अयशस्वी झालेल्या शस्त्रक्रियांची आहे. औरंगाबाद येथील कार्डियाक सर्जन डॉ. महेश केदार हे येथील दीपक हॉस्पिटल ला सेवा देतात आणि आत्तापर्यंत डॉ. रामेश्वर सानप, डॉ. विष्णू भुते, डॉ. कृष्णा कोरडे डॉ. कुलभूषण मराठे, डॉ. सोमेश नागरे, यांनी देखील मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासोबत शासनाच्या विविध योजनांमुळे रुग्णांना होत असलेल्या लाभामुळे डॉ. संजय राख यांनी शासनाचेही आभार मानलेआहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com