1.
Jalna Districtजालना जिल्हा

शिक्षकाचे जुगाड ;शेततळ्याचा नौकाविहारासाठी वापर करून शेतातच सुरू केला पर्यटन व्यवसाय

जालना- एका शिक्षकाने शेततळ्याचे जुगाड करून नौकाविहारासाठी याचा वापर सुरू केला आहे आणि त्यामुळे उत्पन्न तर वाढलंच परंतु शेतीलाही एक जोडधंदा मिळाला आहे . शेतीला व्यवसायाची जोड देऊन संकटावर मात कशी करायची? आणि आपल्या सोबतच आणखी काही लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो! याचे एक ताजे उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे असलेल्या एका शिक्षकाचा पर्यटन व्यवसाय.

व्यवसायाने शिक्षक असलेल्या एकनाथ मुळे यांनी शिक्षणाशी असलेली नाळ कायम ठेवत काळ्या मातीशी ही जोडलेली नाळ तोडली नाही. आधुनिक शेतीच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या जिद्दीपुढे परिस्थितीने ही गुडघे टेकले आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यात ड्रॅगन फूड म्हणजे ज्याला आपण पूर्वी निवडुंग म्हणायचो त्याच निवडुंगाचे मोठ्या आकारातील फळ म्हणजे ड्रॅगन. त्याचे उत्पादन घेणे सुरू केले आणि कमी पाण्यात कमी खर्चात त्यांनी हा उपक्रम राबवला. आणि आता त्याच्या कलमा विकून ते नफा कमवत आहेत, त्या पाठोपाठ पांढऱ्या जांभळाची लागवड केली, आणि त्याची मागणी ही वाढली त्यामुळे हळूहळू शेतीला पूरक व्यवसाय मिळू लागले, आणि नंतर आता हुरडा पार्टी. हुरडा पार्टीच्या माध्यमातून आता पर्यटन स्थळासारखं व्यापक स्वरूप त्यांनी या शेतीला दिलं आहे.

नुकत्याच याच ठिकाणी शेततळ्याचा वापर त्यांनी नौका विहारासाठी केला आहे. परिसर हा नैसर्गिक पद्धतीने नटवला आहे. ज्यामध्ये इथेच निवासाचीही व्यवस्था केलेली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा आनंद घेता यावा म्हणून ससे पालन, घोडस्वारी, मुलांसाठी खेळणी आणि जुन्या शेती अवजारांची माहिती इथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नासोबतच एक अतिरिक्त उत्पन्न आणि सुमारे दहा जणांना रोजगारही इथे उपलब्ध झाला आहे.

 

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button