इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या 41 हजार दोनशे रुपयात!
जालना- पेट्रोलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे दर आणि त्या पाठोपाठ दुचाकींच्या वाढलेल्या किमती यामुळे सामान्य माणसाला पुन्हा जुन्या वाहनांच्या खरेदीकडे वळावे लागले आहे. त्यामुळे जुनी दुचाकी देखील सध्या पन्नास हजाराच्या पुढेच मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये अवघ्या 41 हजार दोनशे रुपयात नवीन इलेक्ट्रिक ची स्कूटर मिळत असल्यामुळे अनेकांना एक वेगळा मार्ग सापडला आहे. परंतु एवढ्या कमी किमतीमध्ये ही स्कूटर मिळत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि एन.आर.जी या दुचाकी विक्रेत्या दुकानाचे मालक रवींद्र गायकवाड यांनी याची उत्तरे दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार इतर कंपन्या जाहिरातींवर अमाप खर्च करतात ,परंतु त्यांची कंपनी जाहिरातीवर खर्च न करता एक दुसऱ्याच्या व्हाट्सअप च्या माध्यमातून वाहनांचा प्रचार करत असल्यामुळे या खर्चाची बचत होते. त्यासोबत या वाहनाची वेग मर्यादा कमी असल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेण्याची गरज नाही, तसेच चालवण्यासाठी परवान्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तो खर्च देखील कमी होत आहे. एकूणच वाहनाचा मूळ खर्च आणि विमा या दोन महत्त्वाच्या किमती एकत्रित केल्यामुळे केवळ 41 हजार दोनशे रुपयात हे वाहन ग्राहकांना मिळू शकते. 2016 पासून जालन्यात या वाहनाच्या विक्रीला सुरुवात झाली मात्र त्यावेळी दुचाकीच्या किमती आणि पेट्रोलचे दर कमी असल्यामुळे ग्राहकांचा या वाहनाकडे ओढा नव्हता, मात्र आता याचे महत्त्व कळाल्यामुळे बुकिंग केल्यानंतर सुमारे महिनाभराने आम्ही ग्राहकांना हे वाहन देऊ शकत आहोत. 18 जानेवारी 2023 पासून आत्तापर्यंत 180 वाहनांची विक्री झाली असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.( व्यावसायिक बातमी)
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com