Jalna Districtजालना जिल्हा

रेल्वेने आलेल्या प्रवाशांची पळवा -पळवी; प्रवाशांना विठीस धरण्याचा प्रयत्न

जालना- रेल्वेतून उतरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानका बाहेर न पडू देता स्थानकामध्ये घुसून त्यांची पळवा- पळवी करणाऱ्या रिक्षा चालकांना आता क्रुझर चालकांची भीती वाटायला लागली आहे. कारण क्रुझर चालक देखील आता स्थानिक प्रवासी वाहतूक करीत असल्याचा दावा रिक्षा चालकांनी केला आहे. त्यामधूनच आज सकाळी रेल्वे स्थानकात रिक्षा चालकांनी प्रवासी वाहतूक बंद ठेवून दोन तास प्रवाशांना वेठीस धरले होते.

रिक्षा चालकांच्या म्हणण्यानुसार रेल्वे स्थानक परिसरातच उभ्या असलेल्या क्रुझर या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप आता स्थानिक प्रवासी देखील बसून नेत आहेत. खरंतर त्यांनी बस स्थानकापासून प्रवासी घेऊन जावेत मात्र ते आता जालना रेल्वे स्थानकातूनच प्रवासी घेऊन जात आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना जालना रेल्वे स्थानक ते बस स्थानकादरम्यानचे प्रवासी मिळत नाहीत आणि पर्यायाने हे रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे, ही तक्रार घेऊन सर्व रिक्षा चालक रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याकडे गेले होते. दरम्यान प्रवाशांनी रिक्षाने जावे का क्रुझर न जावे, किती पैसे द्यावेत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु फसवणूक झाली आणि प्रवाशाने जर तक्रार केली तर त्याविरुद्ध कारवाई केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यावर रिक्षा चालकांचे समाधान न झाल्याने, अधिकाऱ्यांनी सांगितले की अशी प्रवासी वाहतूक करत असतानाचा योग्य पुरावा द्या! नंतर कारवाई करू असे म्हणत अवैध प्रवासी वाहतूक होत असेल तर ते स्थानिक पोलिसांच्या आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत आहे, त्याचा रेल्वेशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रवाशांची गर्दी वाढत आहे आणि त्यातच लवकरच बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथे देखील यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केल्या जाते, हे सर्व प्रवासी जालना रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर या क्रुझरमध्ये जनावरा सारखे भरून त्यांची वाहतूक केल्या जाते. त्यामुळे रिक्षाचालकांचा देखील रेल्वे स्थानक ते बस स्थानक दरम्यानचा व्यवसाय ठप्प होतो.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button