मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगल्या जात्यावरच्या ओव्या आणि विद्यार्थिनींच्या फुगड्या
मराठी राजभाषा दिन जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून ग्रंथ दिंडी काढली होती. ग्रंथदिंडीच्या मिरवणुकी दरम्यान विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला .
शाळेमध्ये कुसुमाग्रज सभागृहात विद्यार्थ्यांनी साहित्यिकांची चित्रे रेखाटलेले प्रदर्शन भरवण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान अस्सल मराठीतील जात्यावरच्या ओव्या देखील विद्यार्थिनींनी सादर केला. त्यामुळे आपल्या मराठीचे वैभव काय होते हे! जाणवत होते. सभागृहाच्या उद्घाटनाला कवयत्री आरती सदाव्रते यांची उपस्थिती होती.या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दिव्या बुलबुले,भाग्यश्री वाघमारे,जयश्री नन्नवरे, ऋतुजा मुंडे,जान्हवी जाधव यांच्या ओव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रेखा हिवाळे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक व मराठी विभागाचे प्रमुख रामदास कुलकर्णी यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा शिंदे व रेवती इंगळे यांनी केले.यावेळी इयत्ता आठवी नववी वर्गातील विद्यार्थी व शिक्षक किरण धुळे श्रीमती शारदा दहिभाते उगले श्रीमती स्वप्नजा खोत आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com