तारीख पे तारीख! खरात दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी लांबली
जालना – जीडीसी प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या खरात दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीची तारीख पुन्हा एकदा लाभली आहे.
ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी, म्हणजेच गोल्ड डिजिटल कॉइन, अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या या आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप या प्रकरणातील मुख्य आरोपी जालना येथील किरण खरात आणि त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात यांच्यावर आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दांपत्य फरार आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आत्तापर्यंत चार वेळा काही ना काही कारणामुळे निर्णय लांबणीवर पडला होता. न्यायालयाने आज अंतिम निर्णय सुनावणार असे जाहीरही केले होते. मात्र आज न्यायालय सुट्टीवर असल्यामुळे हा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे, आणि आता अटकपूर्व जामीनावरील अर्जाची सुनावणी 8 मार्च ला होणार आहे .
या प्रकरणात आत्तापर्यंत सय्यद इरफान, व्यंकटेश भोई, रमेश उत्तेकर, अमोद मेहतर आणि अमोद यांची पत्नी शर्वरी अमोद मेहतर हे सात आरोपी आहेत. दरम्यान जालन्यातील आणखी एका आठव्या आरोपीला अटक करण्याच्या तयारी आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस करीत आहेत. एकूण सात आरोपींपैकी दोन आरोपी या महिला आहेत शर्वरी मेहतर यांच्या नावावर अमोद हे सर्व बँकेचे व्यवहार करत होते. ग्लोबल एंटरप्राइजेस या नावाने बँकेमध्ये करंट म्हणजे चालू खाते उघडले होते त्यामुळे हा करोड रुपयांचा व्यवहार होत असतानाही आयकर विभाग किंवा बँक व्यवस्थापनाने देखील त्याकडे लक्ष दिले लक्ष दिले नाही, आणि सुमारे 20 करोड चे व्यवहार शर्वरी मेहता यांच्या खात्यावर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com