1.
बाल विश्व

चहापीत बसलेल्या स्टॅम्प व्हेंडरवर चाकू हल्ला;पहा cctv

जालना-कार्यालयीन कामकाज आटोपून चहा पीत बसलेल्या मुद्रांक विक्रेत्यावर अचानक चाकू हल्ला झाला. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांसह शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. संभाजी उर्फ सुहास संपतराव डेंगळे वय 50 हे दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ स्टॅम्प वेंडर म्हणजेच मुद्रांक विक्रेते म्हणून काम करतात. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कार्यालयाजवळच असलेल्या मुक्तेश्वर द्वार जवळ असलेल्या एका चहाच्या दुकानावर ते मित्रांसह चहा पीत बसले होते. त्यांच्या बाजूला एक अनोळखी ईसमदेखील बराच वेळ त्यांच्यासोबत बसला होता. काही वेळातच त्याने शेजारीच बसलेल्या संभाजी ढेंगळे यांच्या मानेवर चाकू हल्ला केला, आणि पळून गेला.

तो पळत असताना उपस्थित आणि खुर्च्या  फेकून मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्या लागल्या नाहीत. त्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला. संभाजी ढेंगळे यांच्या मानेला मोठी जखम झाली असून त्यांना सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. दरम्यान रुग्णालयात येऊन पोलिसांनी श्री.ढेंगळे यांच्या प्रकृतीची चौकशी करून सविस्तर माहिती घेतली आहे. पुढील तपासाला ते लागले आहेत.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button