1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

फक्त पंधरा दिवस, कामात सुधारणा करा अन्यथा महिला आयोग आपले काम करेल- महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांचा प्रशासनाला दम

जालना-जिल्हा प्रशासनाच्या, विशेष करून पोलीस, आणि आरोग्य प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत 15 दिवसात कामात सुधारणा करा नाहीतर महिला आयोग आपल्या पद्धतीने काम करेल, असा सज्जड दम महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी जिल्हा प्रशासनाला भरला आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त करत अवैध गर्भपाताचे खोटे आकडे, दामिनी पथकाची असमाधानक कारवाई ,आणि जिल्ह्यामध्ये महिलांच्या आलेल्या प्रचंड तक्रारी त्यासोबत Edtv news ने उपस्थित केलेला अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त तरुण मुलींची सुधारगृह नसल्यामुळे होत असलेली दैना या सर्वच बाबतीत श्रीमती चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातल्याबद्दल त्यांनी Edtv चे धन्यवाद मानले. पत्रकार परिषदेत सर्वांच्या प्रश्नांना श्रीमती चाकणकर यांनी दमदारपणे उत्तरे देत पोलीस प्रशासनाबाबत मात्र चांगलीच उदासीनता व्यक्त केली.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button