Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

त्याचे पुढे काय?”तो “हल्ला शेतीच्या निकाल विरोधात गेल्याच्या रागातून

जालना-शेतीचा निकाल विरोधात गेल्याचा राग मनात धरून सुहास संपतराव ढेंगळे ,53 यांच्यावर वस्तऱ्याने वार केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

काल सायंकाळी साडेसहा वाजता मुद्रांक विक्रेते सुहास संपतराव ढेंगळे हे आपल्या मित्रांसह कचेरी रोडवरील महाराष्ट्र हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. याचवेली त्यांच्या शेजारी बराच वेळ बसलेल्या एका तरुणाने ढेंगळे यांच्या मानेवर वस्तऱ्याने वार केला, एवढेच नव्हे तर त्यांच्या मित्रावरही वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपस्थित असलेल्या इतर लोकांनी आरोपीला खुर्च्या फेकून मारून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो निसटला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपी भागेश उर्फ बाळू शाळीग्राम जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान नागेवाडी शिवारातील गट क्रमांक 273 मधील काही जमिनीचा वाद भागेश जाधव आणि इतरांमध्ये सुरू आहे या प्रकरणात सुहास डेंगळे यांनी समोरच्या पक्षकाराला मदत केल्याचा राग भागेश जाधव यांच्या मनात होता आणि त्या अनुषंगाने हल्ला करण्यापूर्वी किरकोळ भांडणही झाले होते. त्यानंतर 24 एकर शेतीचा निकाल हा आरोपी भागेश च्या विरोधात गेला आहे. आणि त्याला कारणीभूत सुहास डेंगळे आणि त्यांचा सहकारी आहे हा राग मनात धरून त्यांनी सुहास ढेंगळे यांच्यावर प्राण घातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यामध्ये आरोपी भागेश जाधव यांच्या विरोधात खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या भादवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button