Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सावधान! H3N2 ची साथ सुरू आहे ;अशी घ्या काळजी

जालना -सन 2009 मध्ये H1-N1 ही स्वाइन फ्लूची साथ आली होती. या साथी प्रमाणेच आता पुन्हा मागील महिनाभरापासून H3-N2 या इन्फोएन्झा व्हायरसची साथ आलेली आहे, परंतु अजून या साथीला नाव देण्यात आलेले नाही. या आजाराच्या रुग्णांमध्ये गेल्या महिन्याभरात दुपटीने वाढ झाली आहे. खरंतर सर्दी, खोकला, ताप ,कोरडा खोकला, दम लागणे ,नाक गळणे हे बाराही महिने सुरू असलेले आजार आहेत. परंतु ज्यावेळी अचानक एखाद्या आजाराच्या रुग्णसंखेत वाढ होते त्यावेळेस त्या आजाराची साथ सुरू झाली असे म्हणतात. त्यानुसार सध्या h3n2 या आजाराची साथ सुरू आहे. त्यामुळे घराघरांमध्ये वरील आजाराची लक्षणे असलेले रुग्ण दिसत आहेत .दरम्यान या आजाराची लक्षणे, उपाय आणि खात्री विषयी शहरातील निरामय हॉस्पिटलचे डॉ. पद्माकर सबनीस यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉ. सबनीस म्हणाले,

” गेल्या महिनाभरापासून या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे, आणि त्याला आता आय. सी. एम. आर. म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी पत्र काढून ही साथ असल्याचे जाहीर केले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी हीच लक्षणे असलेली SARI( सिव्हियर अॅक्युट रिस्पॅरिटी इन्फेक्शन )ही साथ आली होती. त्याची देखील हीच लक्षणे होती. या आजारामध्ये 90% रुग्णांना ताप खोकला येतो, दहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते त्यापैकी सात टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती करावे लागते. हा आजार किमान सात दिवस तरी राहतो .असे असताना रुग्णांनी हायर अँटिबायोटिक घेणे टाळावे.” असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे हवा दूषित पाणी, हस्तांदोलन, शिळेअन्न खाणे, यापासून होऊ शकतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून नागरिकांनी वारंवार हात धुवावेत, सामाजिक अंतर पाळावे, तसेच मास्क वापरणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही डॉ. सबनीस यांनी सांगितले. विशेष करून हा आजार पंधरा वर्षे वयाच्या आतील बालकांना आणि 45 वर्ष च्या पुढील नागरिकांना होत आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button