उत्कर्ष थिएटर्सच्या “हैवान”ला प्रेक्षकांची दाद
जालना -उत्कर्ष थिएटर्स आणि नाट्यांकुर संस्थेच्या वतीने “हैवान” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग जालन्यात झाला .जे. इ. एस. महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर हजारो प्रेक्षकांच्या समोर ,ना रीटेक ना एडिटिंग करत खुल्या रंगमंचावर या प्रयोगाने उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. नाट्यप्रयोगाच्यापूर्वी उपस्थित मान्यवरांमध्ये उद्योजक सुनील रायठा प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, तहसीलदार श्रीकांत भुजबळ ,आस्था हॉस्पिटलचे डॉ. आदिनाथ पाटील, कवयित्री संजीवनी तडेगावकर, सामाजिक कार्यकर्त्या अनया अग्रवाल यांची उपस्थिती होती .संगीत शिक्षक दिनेश संन्याशी आणि अंजली काजळकर यांच्या नांदी गायन आणि दीप प्रज्वलन करून या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली.
या प्रयोगाचे क्षणचित्रे आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा EDTV NEWS चा हा प्रयत्न. याच कार्यक्रमात औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “दानपत्र” या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल डायरेक्टर अभिजीत चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला .
नाटकातील पात्र परिचय पुढीलप्रमाणे.
लेखक-दिग्दर्शक-सुमित शर्मा
रंगभूषा-वेशभूषा सतीश लिंगडे
नेपथ्य-मुकुंद दुसे, संजय भिंगारे
प्रकाश योजना-ओमकार बिनीवाले, मिलिंद दुसे
संगीत-आनंद घुले, आदित्य मुदिराज, ओंकार सुलाखे
पात्र-
रेखा चव्हाण- लाली
सुनील गव्हाणे- अमोशा
सतीश लिंगडे- बापू
सुंदर कुंवरपुरिया- नारायण राव
मुकुंद दुसे- मारुती
राहुल काळे- पिंटू
पवन खांदे- सँडी
तेजस्विनी वाघमारे- ट्विंकल
प्रेरणा सराफ कुलकर्णी- लक्ष्मी
गणेश लोखंडे- राजकुमार
सोहन भुरेवाल- गावकरी
अथांग लिंगडे- गावकरी
हर्ष वैद्य- गावकरी
आणि
सुमित शर्मा- म्हातारी.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com