त्याच पुढे काय झालं?पुन्हा लांबली खरात दांपत्याची सुनावणी; उद्या रमेश उतेकर च्या जामीन अर्जावर सुनावणी; दीड महिन्यापासून खरात दांपत्य लागेना पोलिसांच्या हाताला
जालना- गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला जेडीसीसी (ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन )चा तपास संपता संपेना. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले जालन्याचे प्रमोटर किरण खरात आणि सौ.दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबली आहे. आत्तापर्यंत चार वेळा ही सुनावणी लांबली आहे आणि आता दहा मार्च रोजी या अर्जावर निर्णय होणार आहे.
या प्रकरणात 4 फेब्रुवारीला अटक केलेले आरोपी रमेश उत्तेकर यांचा न्यायालयात जामिनासाठी अर्ज आला आहे आणि न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. त्याच्या या अर्जावर उद्या दि.9 रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान 16 जानेवारीला कदीम जालना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरण दांपत्य फरार आहे. दीड महिना उलटूनही पोलिसांना अजून या दांपत्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे मोठमोठ्या गुन्हेगारांचा आणि एकट्या फिरणाऱ्यांचा तपास पोलीस लावण्यात यशस्वी झाले आहेत, असे असतानाही हे दोघे पोलिसांच्या हाती कसे लागत नाहीत? याबद्दल सामान्य माणूस आता आश्चर्य व्यक्त करीत आहे. कारण याच प्रकरणावर पुढील बराच काही तपास अवलंबून आहे. याच प्रकरणांमध्ये आणखी एक आठवा आरोपी भरती होण्याची शक्यता आहे,त्या आठव्या आरोपीला अटक करण्याची तयारी पोलीस करीत आहेत, मात्र तो आरोपी देखील सध्या फरार असल्यामुळे जर किरण खरात यांना अटकपूर्व जामीन मिळाली तर त्याच निर्णयाच्या आधारे या आठव्या आरोपीला देखील अटकपूर्व जामीन मिळू शकतो, त्यामुळे पोलिसांना कोणत्याही परिस्थितीमध्ये किरण खरात यांना जामीन मिळू नये यासाठीच लढा द्यावा लागणार आहे. कदाचित अटकपूर्व जामीन मिळाला तर पोलिसांना पुन्हा उच्च न्यायालयात या न्यायालयाच्या विरोधात आव्हान द्यावे लागणार आहे. त्यातच आता दोषारोप पत्र दाखल करण्याचे दिवसही संपत आले आहेत .त्यामुळे तपासाला गती देण्याशिवाय आता पोलिसांकडे पर्याय नाही.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com