अंबड येथील तलावात मृत माशांचा तवंग
अंबड -जालना येथील मोती तलावात चार दिवसांपूर्वीच लाखो माशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या घटनेप्रमाणेच अंबड शहरातील तलावात देखील माशांचा मृत्यू झाला आहे, आणि ठेकेदाराने नगरपालिका प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
चार दिवसांपूर्वी जालना शहरातील मोतीबाग तलावात मृत मासे तरंगताना दिसत होते, अगदी त्याच पद्धतीने अंबड शहरात मत्सोदरी देवीच्या पायथ्याशी असलेल्या जंगी तलावात दिनांक सात रोजी मृत मासे तरंगताना दिसले. या तलावाचा मत्स्य व्यवसायाचा ठेका सैफान फारुकी यांना मच्छी पालनासाठी नगरपालिकेने 18 लाख 96 हजार रुपयांमध्ये दिला होता. त्यापैकी 14 लाख 22 हजार रुपयांचा भरणा नगरपालिकेकडे केला आहे. दरम्यानच्या काळात अतिवृष्टीमुळे तलावामध्ये सोडलेले मत्स्यबीज वाहून गेले आणि या ठेकेदाराचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा मच्छबीज जाणून तलावात सोडले आणि दिनांक सात रोजी या तलावातील मासे मृतावस्थेमध्ये पाण्यावर तरंगताना दिसले. दरम्यान सात तारखेला धुलीवंदनाची सुट्टी असल्यामुळे ठेकेदाराला नगरपालिकेत कोणीही उपलब्ध झाले नाही आज आठ तारखेला ठेकेदाराने नगरपालिकेकडे 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. ठेकेदाराचे तर आर्थिक नुकसान झालेच मात्र, माशांचा हा जीव का घेतला आणि यामधून कोणाचा फायदा झाला? याचा तपास करणे ही आता गरजेचे झाले आहे, कारण एकाच आठवड्यात ही दुसरी घटना आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com