पहा कशी सुरू आहे जिल्हा प्रशासनाची ही”कॉपीमुक्त” परीक्षा
जालना- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी कधी नव्हे ते पहिल्यांदाच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग एकत्र आले आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्याचे ठरले. त्यासाठी बंदोबस्त ही तैनात करण्यात आला. भरारी पथकेही झाली, परंतु तरीदेखील कॉपीला आळा घालण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथील परीक्षा केंद्रावरील हा व्हिडिओ.
बारावीच्या परीक्षांमध्ये देखील अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरी दहावीच्या परीक्षा कडक बंदोबस्तामध्ये आणि कॉफी मुक्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र झाले उलटेच बारावीच्या परीक्षांपेक्षा दहावीच्या परीक्षांमध्ये जास्त कॉपी होत आहे, आणि हा प्रकार ज्या कामासाठी होमगार्ड ची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, त्या होमगार्डच्या समोर होत आहे त्यामुळे या होमगार्डला नियुक्त करण्याचा उद्देश काय? हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. होमगार्ड यांची नियुक्ती, त्यांचे भत्ते आणि एकंदरीतच त्यांच्या कामाचा आढावा हा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात येतो .त्यामुळे अशा आरामशीर खुर्चीत बसून विद्यार्थ्यांना कॉपी करू देणाऱ्या या होमगार्ड वर अप्पर पोलीस अधीक्षक कारवाई करतील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान उर्वरित विषयांच्या परीक्षा तरी कॉपीमुक्त व्हाव्यात जेणेकरून जिल्हा प्रशासनाने घेतलेली एवढी मेहनत फळाला येईल एवढीच अपेक्षा.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com