Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

फिरत्या लोकआदालत मधून पाच प्रकरणांमध्ये तडजोड

जळगाव सपकाळ -भोकरदन तालुक्यातील  मौजे जळगाव सपकाळ येथे दि 8 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा तालुका विधी सेवा प्राधिकरण भोकरदन व वकील संघ भोकरदन यांचे सयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन द्वारे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  लोकअदातीस न्यायाधीश म्हणुन  सी.एस. देशपांडे, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर भोकरदन तसेच पंच म्हणुन अॅड. एस.यु.गाढे यांनी काम पाहिले तसेच वकील संघ अध्यक्ष अॅड.  राजेद्र सपकाळ, वकील संघाचे  तसेच विधीज्ञ श्री. व्हि.बी.सपकाळ, अनिल साबळे यांची उपस्थिती होती.

यावेळी मी तडजोडीने प्रकरणे मिटविल्यास पक्षकारास होणारे फायदे समजावून सांगून  जास्तीत जास्त प्रकरणे लोकलदालत मध्ये मिटवण्याचे आवाहन गावक-यास केले. या आवाहनाला प्रतिसाद देत दिवाणी व फौजदारी एकुन 05 प्रकरणे लोकअदालत मध्ये मध्यस्थिने निकाली निघाली आहे. लोकअदालतीच्या नियोजनासाठी सरपंच  केतन साबळे उपसरपंच , रमेश सपकाळ  डॉ. शालीकराम सपकाळ तसेच जि.प.सदस्य शिवाजी बापु सपकाळ ग्रामसेवक  महेन्द्र साबळे व न्यायालयीन कर्मचारी  टेपले, जितेन्द्र गवई, किशोर लोणकर, गंवाडे, दारासींग घुणावत यांनी परीश्रम घेतले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button