1.
Jalna Districtजालना जिल्हा

पोलीस ठाण्यातच चोरी; जप्त केलेल्या अडीच लाखांच्या गुटख्यावरच डल्ला

जालना- पोलिसांनी जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटक्या मधून एक दोन पुड्या गायब होणे किंवा पळवणे माणूस समजू शकतो, मात्र तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांचा गुटखा चोरून नेल्याची घटना परतुर पोलीस ठाणे अंतर्गतच नव्हे तर पोलीस ठाण्यातच घडली आहे.

महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी बंदी असलेला प्रीमियम राजनिवास आणि गोवा गुटखा हा मागील वर्षी परतुर पोलिसांनी जप्त केला होता, आणि तो परतुर पोलीस ठाण्यात असलेल्या उत्तरे कडील खोलीमध्ये ठेवला होता. जप्त केलेला हा मुद्देमालच आरोपी शत्रुघ्न उत्तमराव सोळंके, राहणार सन्मित्र कॉलनी, परतुर यांनी दिनांक 24 जानेवारीनंतर येथील कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करून पळवला आहे. पोलिसांनी जप्त केलेला गुटका ठेवलेल्या खोलीच्या कुलपाच्या किल्ल्या विश्वासघाताने सोळंके यांनी हस्तगत केल्या आणि प्रीमियम राजनिवास हा 50 हजार रुपयांचा तर गोवा गुटखा हा एक लाख 90 हजार रुपयांचा असा एकूण दोन लाख 40 हजार रुपयांचा पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यावरच डल्ला मारला आहे. याप्रकरणी दि.9 रोजी रात्री उशिरा परतुर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी भागवत खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शत्रुघ्न उत्तमराव सोळंके यांच्या विरुद्ध भादवि कलम 406, आणि 379 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे .

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button