Jalna Districtजालना जिल्हा

पाच सख्ख्या बहिणींपैकी एक असलेल्या भागुबाईदेवीची उद्यापासून यात्रा

जळगाव सपकाळ- भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील नवसाला पावणाऱ्या माता भागुबाई देवीची यात्रा उत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे.

यात्रेनिमित्त जळगाव सपकाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंदिर समिती, ग्रामपंचायतसह प्रशासनाच्या वतीने यात्रेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. भागुबाई देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भ ,खानदेश ,आदीभागातून हजारो भाविक येतात. भागुबाई देवस्थान तुळजाभवानीचे उपस्थान म्हणून ओळखले जाते, माता भागुबाईचा जन्म इ. स.१२०० शके फाल्गुन कृ. ५ रोजी झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे रविवार दिनांक१२ मार्च २०२३ रोजी देवीची भव्य यात्रा भरते तसेच ४:३० ते ५वा. दरम्यान देवीची स्वारी निघते, यात्रेची सुरुवात रंगपंचमीपासून होते. रंगपंचमीच्या दिवशी गावातील जुन्या चावडीवर कापडी मंडप देण्याची प्रथा आहे. या कार्यक्रमाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन हा मंडप उभा केला जातो, यामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने भाग घेतात या ठिकाणी देवीचे दोन मंदिरे आहेत. एक मंदिर गावात असून दुसरे मंदिर गावाबाहेर आहे. देवीची स्वारी बिडवई यांच्या घरापासून निघून होळीच्या ठिकाणी विसर्जित होते. या स्वारीच्या दिवशी पोत मशाल पेटवून खेळतात, पोत खेळण्याचे नवस मानले जातात त्यामुळे प्रत्येक भाविकांच्या हातात पोत असल्याने परिसर उजळून निघतो व मातेच्या जयघोषात स्वारीचे विसर्जन होते. भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात.

विशेष म्हणजे जळगाव सपकाळ येथील माता भागुबाई ही सर्वात पहिली  देवताअसून या परिसरातील अनवा येथील श्री .आजुबाई माता पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुका माता, शिवना येथील शिवाई माता, वडोद तांगडा येथील अंबाबाई माता या पाच देवीच्या सख्ख्या बहिणी असल्याची कथा आहे .माता भागुबाई देवी सर्वात मोठी असून या देवीला स्वारीचा पहिला मान मिळाला आहे. गावातील कामानिमित्त बाहेर गावी गेलेले पुरुष व लेकीबाळी स्वारी निमित्त आवर्जून गावात येतात. त्यामुळे गावात प्रत्येकाच्या घरी एक प्रकारे दिवाळीच साजरी होते, गावातील पुजारी विजय महाराज हे गेल्या अनेक वर्षापासून देवीची स्वारी घेतात. यापूर्वी त्यांच्या पूर्वजापासून मातेची स्वारी घेण्याचा मान त्यांना मिळाला आहे. रविवारी रात्रभर सोगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये मासोळी,गणपती, नंदी, महिषासुर, आधी देवी देवतांचे सोग गावातील ठरवलेले मानकरी घेतात. या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक सरपंच पोलीस ठाण्याचे कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवतात.  भागुबाई संस्थानचे पुजारी विजय महाराज व भागुबाई संस्थानचे अध्यक्ष सुभाष सपकाळ, सचिव राजेश रमेश गाडेकर, तसेच पांडुरंग सपकाळ साहेबराव नेमाने व गावातील ज्येष्ठ नागरिक या यात्रेचे नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत.——–दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button