कंत्राटदार पवार यांच्या मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी करा; संघटनेची मागणी
जालना- नगरपालिकेमध्ये गेल्या वीस वर्षांपासून शासकीय गुत्तेदार म्हणून कार्यरत असलेल्या एम.पी.पवार यांचा दोन दिवसांपूर्वी घाणेवाडी जलाशयामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी जालना जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्यांच्या मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी निवेदन स्वीकारले.
मधुकर पवार हे हरवल्याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यात दि.14 ला दाखल झाली होती आणि त्यानंतर तपास करीत असताना पोलिसांना घाणेवाडी जलाशयात त्यांचा मृतदेह सापडला त्यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com