Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

20 मार्च चिमणी दिवस;चिमण्या जगवण्यासाठी झटणारा अवलिया “जगदीश गौड”

जालना-आपल्या बालपणी ज्या काऊ चिऊंच्या साक्षीने आईने आपल्याला घास भरवले त्याच चिउंची आज दयनी अवस्था झाली आहे. भविष्यामध्ये ही चिमणी देखील आपल्याला एका पिंजऱ्यात किंवा फोटोमध्येच पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको. ग्रामीण भागातील चिमण्या तर गायब झाल्याच आहेत ,आता शहरी भागात घराच्या कुठेतरी कोपऱ्यात कडी-कचरा जमून घरटी करणारी चिमणी ही गायब व्हायला लागली आहे, कारण ना तिला खायला दाना मिळत आहे ना प्यायला पाणी मिळत आहे. या चिमण्या फक्त आता स्वस्त धान्य दुकानांच्या समोर दाणे टिकताना दिसत आहेत, कारण तेच एक ठिकाण आहे जिथे या चिमण्यांना चारा मिळतो . धान्य चढउतार करताना खाली सांडतं आणि अशी दुकाने ही कुठेतरी गल्लीबोळात असतात, त्यामुळे तिथे मोबाईलचे टॉवर ही नसते आणि रेडिएशनचा धोकाही नसतो, म्हणून देखील तिथे चिमण्या दिसायला लागल्या आहेत.


खरंतर चिमणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा! एखादी आई एखाद्या मुलावर कसे प्रेम करते! कसा घास भरवते हे जर पाहायचे असेल तर चिमणी सारखे दुसरे उदाहरण नाही. माणसांमध्ये वावरणारा मात्र माणसांपासून अलिप्त असलेला, कोणाच्याही हाती न लागणारा हा छोटासा पक्षी. खरे तर अंगणात ज्यावेळेस या पक्षाची चिव- चिव सुरू होते त्यावेळेस एक वेगळाच आनंद मिळतो. दुपारच्या शांत वेळेत हा आवाज आपले लक्ष वेधून घेतो.
कोणताही उपद्रव न करता उलट अंगणात चिव- चिव करत असताना अनावश्यक असलेले किडे खाऊन अंगण स्वच्छ ठेवणारी ही चिमणी. या चिमणीला वाचविण्यासाठी जालन्यातील एक अवलीया व्यक्ति झटत आहे. ज्याचं नाव “जगदीश गौड” . यांच्या घरात पाहिलं तर उंच भिंतीवर टांगलेली चिमण्यांची घरटे जी मानवनिर्मित आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्या आकर्षित व्हाव्यात म्हणून सर्व परीने प्रयत्न केले गेले आहेत. चिमण्या अंडे देण्यापूर्वी कडी-कचऱ्यापासून सुरक्षित घर तयार करतात. ज्यामध्ये ही अंडीही सुरक्षित राहतात आणि अंडी दिल्यानंतर काही दिवस पिलांना घास भरवण्यासाठी या घरट्यांचा उपयोग करतात. सद्य परिस्थितीत सिमेंटच्या जंगलात चिमण्यांना काडीकचरा मिळत नसल्यामुळे सुतळीपासून मोकळे झालेले दोरे आणि कुलर मध्ये जे गवत वापरले जाते ते गवत इतरत्र कुठेतरी टांगून चिमण्यांना ते उपलब्ध व्हावे या या हेतूने ठेवलेले आहे. चिमण्या देखील याचा आवर्जून वापर करतात.

*विशेष योजना*
घरट्यात चिमणी दाखवा आणि घरटे मोफत मिळवा. चिमण्यांची घरटे तयार करून ते विकून पैसा कमावणे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता, घरटी तयार करण्यापेक्षा जास्त खर्च येऊनही कमी खर्चात ही घरटी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अवघ्या शंभर रुपयात एक घरटे दिल्या जात आहे, आणि या किमतीपेक्षाही अनमोल अशी योजना राबविली जात आहे. ती म्हणजे एक घरटे घेऊन गेल्यानंतर या घरटात जाणाऱ्या- येणाऱ्या चिमण्यांचा व्हिडिओ काढायचा आणि तो जगदीश गौड यांना दाखवायचा. आणि एक घरटे मोफत घेऊन जायचे, परत त्या घरट्यासोबत तुम्ही असाच उपक्रम करू शकता आणि आपणास शंभर रुपयांमध्ये हवे तेवढे घरटे घेऊन जाऊ शकता. फक्त त्याच्यात चिमण्या दिसल्या पाहिजेत एवढाच त्यांचा अट्टाहास आहे. चिमण्यांच्या चिवचिवटामुळे आपलं घर तर शोभून दिसतच,आणि आपणही कोणाला आधार देऊ शकतो याचाही आनंद या चिमण्यांमुळे आल्याशिवाय राहत नाही.

*चिमणिदिनाचे महत्व*
चिमणीचे आणि माणसाचे नाते सुमारे दहा हजार अंगणात आणि घरांच्या अवतीभवती नाचणारी ही चिमणी आज बेघर झाली आहे. प्राप्त माहितीनुसार चीन देशाने 1958 ते 62 च्या दरम्यान चार कीटकनाशक नष्ट करण्याची मोहीम राबवली होती, कारण ते पिकांचा नाश करत होते. त्यामध्ये उंदीर माशा, डास, आणि चिमण्या यांचा समावेश होता. चिमण्या मारण्याच्या अभियानामुळे चीनमध्ये चिमण्या जवळपास नष्ट झाल्या आहेत. ज्याचा गंभीर परिणाम पर्यावरण असंतुलन होण्यात झाला. त्यामुळे आता जगाने चिमण्या जगायला हव्यात यासाठी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस( स्पॅरो डे )म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सन 2010 पासून दरवर्षी आता सर्वत्र चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button