मंठा पोलिसांनी पकडले वाळूचे दोन ट्रॅक्टर; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
मंठा -महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा गैरफादा घेत मंठा तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करणारी दोन ट्रॅक्टर मंठा पोलिसांनी पकडले आहेत. सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांचे सहकारी विलास कातकडे, दीपक आडे, पांडुरंग निंबाळकर, प्रशांत काळे ,रखमाजी मुंडे, यांनी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील टाकळखोपा येथे असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात छापा मारला, यावेळी टाकळखोपा येथील ज्ञानेश्वर विष्णुपंत लाड हे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 21 bg 96 65 मध्ये एक बरास वाळू घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागला, तसेच याच गावातील लक्ष्मण विठोबा गायकवाड हा देखील अशाप्रकारे विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करत असताना पोलिसांना सापडला. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून गौण खनिज प्रतिबंधात्मक कायद्यान्वये मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही ट्रॅक्टर सह ट्रॉली, त्यामधील वाळू, असा एकूण सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com