Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, अवजारे, सल्ला, आणि अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी चला कृषी प्रदर्शनात; जालन्यात भरतय पाच दिवसीय कृषी प्रदर्शन

जालना- कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरातील भोकरदन नाका ते मोंढा रोड येथील गोरक्षण समितीच्या पांजरपोळ मैदानावर दि.23 ते 27 मार्च 2023 हा महोत्सव संपन्न होणार आहे. याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे आणि आत्म्याच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांनी केले आहे.

खरंतर कृषी म्हटलं तर ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ आपल्या लक्षात येते, परंतु ग्रामीण भाग, त्या भागामध्ये शेतकरी महिलांचे आणि शेतकऱ्यांचे जीवन तसेच महिलांच्या उद्योगाला उभारी मिळावी, शेतकरी महिला घर चालवत ,शेती करत उद्योग व्यवसायात देखील पुढे आल्या आहेत. त्यांच्या नियोजनाचा शहरी भागातील महिलांना फायदा व्हावा आणि शहरी भागातील महिलांकडून एक कौतुकाची थाप या महिलांच्या पाठीवर पडावी या हेतूने हा महोत्सव जालना शहरात आयोजित करण्यात आला आहे. शेती महोत्सव म्हटले की धनधान्यांची रेलचेल आलीच इथे विविध प्रकारच्या धान्याच्या आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून वर्षभर पुरेल एवढे धान्य साठवता येईल त्यासोबत जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ग्रामीण भागातील अस्सल भोजनाचा स्वादही येथे मिळेल त्यामुळे एक वेगळाच आनंद शहरी भागातील नागरिकांना येईल आणि ग्रामीण भागातील महिलांना देखील उत्पन्नातून याचा फायदा होईल हा देखील या महोत्सवाचा उद्देश आहे महिलांसोबतच शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेती विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा नवनवीन आलेल्या अवजारांचे प्रदर्शन पाहून कमी खर्चात कमी मेहनतीमध्ये जास्त शेती कशी करता येईल याचे देखील उत्तर इथे मिळणार आहे शेती करत असताना काय करावे काय नाही कोणते पीक कधी घ्यावे वातावरणातील बदलांना कसे सामोरे जावे याविषयी देखील मान्यवरांची चर्चासत्र इथे होणार आहेत.

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी , प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपाआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धेच्या वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील.
कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक ही थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे हा या कृषी महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

*काय असणार आहे कृषी प्रदर्शनात*
कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा भाग असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहिल. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेण्यात येईल.जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचित सन्मान करुन स्मृतीचिन्ह वितरण करण्यात येतील.
जिल्हा कृषी महोत्सवाअंतर्गत कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात शासकीय दालनामध्ये 40 स्टॉल्स, कृषी निविष्ठा 30, कृषी तंत्रज्ञान व सिंचन 30, गृहोपयोगी वस्तू 40, धान्य महोत्सव 20, खाद्यपदार्थ 20 अशा एकूण अंदाजे 200 पेक्षा जास्त स्टॉलचा समोवश असेल. शासकीय दालनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व उपक्रम यांचे स्टॅाल्स असतील. या कार्यक्रमाकरिता पुढील शासकीय विभाग, कार्यालये, यंत्रणांच्या दालनांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button