पेपर उत्पादन करणाऱ्या शहा परिवारातील चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल ;Edtv Newsने फोडली होती वाचा
जालना- शेवटी हैदराबाद येथील लिंगाशेट्टी परिवाराला न्याय मिळाला आहे ,आणि पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्या आदेशावरून कदीम जालना पोलीस ठाण्यात नरेश यादीभाई लिंगाशेट्टी याचा खून केल्याच्या आरोपावरून पेपर उत्पादक कंपनीचे मालक विनोद शहा ,दीपेश शहा, भावेश शहा, आणि जिग्नेश शहा, या चार आरोपीविरुद्ध नरेश ची आई भाग्यमा यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यमा चे पती यादीभाई हे देखील याच कंपनीत कामाला होते. त्यांच्या पीएफचे आणि कॉम्पेन्सेशनचे तीन लाख रुपये मागण्यासाठी नरेश आला होता .परंतु त्याला पैसे न देता आरोपी त्यांनी नरेशाला हाकलून दिले आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. यानंतर नरेशने आपल्या जीवाला धोका असल्याची चिठ्ठी खिशात लिहून ठेवली होती, आणि जर माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला हे चार जण जबाबदार असतील असेही म्हटले होते. परंतु पोलिसांनी मागील दोन महिन्यांपासून हा तपास दाबून ठेवला होता.
पोलिसांना ही चिठ्ठी मिळूनही त्यांनी कसलाही प्रकारचा तपास केला नव्हता. परंतु या परिवाराने पोलीस अधीक्षक जालना, औरंगाबाद परिक्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आणि शेवटी काल दिनांक 21 रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात सर्वप्रथम वाचा ईडीटीव्हीने वाचा फोडली होती आणि त्या संदर्भात दिनांक18 रोजी सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि आता गुन्हा दाखल करावा लागला आहे. दिनांक 18 ची सविस्तर बातमी खालील प्रमाणे.
——
-जालना रेल्वे स्थानका जवळ असलेल्या उड्डाणपुलाजवळ दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी नरेश यादीभाई लिंगाशेट्टी या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याचा अंत्यविधीही केला. परंतु नरेश याचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खून करण्यात आल्याची तक्रार नरेश ची आई भागम्मा यादीभाई लिंगाशेट्टी ,वय 58 वर्ष, राहणार बाललिंगापल्ली हैदराबाद, यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिनांक 3 मार्च रोजी केली आहे. तसेच पेपर उत्पादन करणाऱ्या औद्योगिक परिसरातील ज्या कंपनीत तो कामाला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे .परंतु पोलीस दरबारी त्यांची फिर्याद ऐकून घेण्यासाठी कोणीही तयार नाही .त्यामुळे कदीम जालना पोलीस ते पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पुन्हा कदीम जालना पोलीस पुन्हा पोलीस अधीक्षक या चक्रामध्येच हे कुटुंब हैराण झाले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊनही यामध्ये पुढे काहीच तपास होत नाही. त्यामुळे मयताची बहीण ,मयताची आई, चुलत भाऊ, काकी याच चार जणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडले आहे.
नरेश लिंगा शेट्टी हा जयभवानी नगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांसोबत राहत होता आणि औद्योगिक वसाहतीमध्ये वह्या आणि पेपरचे प्रॉडक्ट करणाऱ्या का कंपनीत गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत होता. ऑपरेटर म्हणून कार्यरत असताना त्याला 25 हजार रुपये दर महा वेतन होते परंतु कंपनी त्याच्या पगारातून दर महिन्याला पाच हजार रुपये कपात करत होते आणि दहा ते बारा लाख रुपयांचे घर देतो असे म्हणत होते. परंतु मुलाला अचानक पैशाची गरज पडल्याने त्याने मालकाकडे पैसे मागितले असता मालकाने धक्काबुक्की करून शहरात असलेल्या त्यांच्या दुकानाच्या बाहेर हाकलून दिले आणि परत पैसे मागितले तर जीवे मारण्याचे धमकीही दिली. एक ते तीन जानेवारी दरम्यान त्यांनी वारंवार दुकानात जाऊन मालकाकडे तगादा लावला होता परंतु पैसे न मिळाल्यामुळे हताश होऊन तो त्याच्या मूळ गावी हैदराबाद कडे जात होता. त्याच दरम्यान दिनांक 4 जानेवारीला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नरेशचा मृतदेह रेवगाव रोड जवळील रेल्वे ब्रिज जवळ दिसला. त्यामुळे कंपनी मालकानेच या कामगाराचा खून केल्याचा आरोप नरेशच्या आईने केला आहे. तसेच याच कंपनीत नरेश चे वडील देखील कार्यरत होते त्यांच्याही पगारातून अशाच पद्धतीने पैसे कपात होत होते परंतु शेवटी त्यांना ते पैसे न देता दोन लाख रुपये देऊन गप्प बसविले असाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान कदीम जालना पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारून देखील नरेशने लिहिलेले कागद पोलीस दाखवायला तयार नाहीत. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन देखील काहीच उपयोग होत नसल्याचा आरोप करून जोपर्यंत आता गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जालना सोडणार नसल्याचा निश्चय हैदराबादच्या या परिवाराने केला आहे.—–
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com