रुक्मिणी परिवाराच्या अंगणात फुलला” पाच वसंतांचा” “वसंत बहर”
जालना- हिंदू नववर्षाचा प्रारंभ जीवनात आनंद फुलविणाऱ्या संगीताने सुरू व्हावा, त्यामुळे पाडव्याच्या पूर्वसंध्येला रुक्मिणी परिवाराच्या वतीने गेल्या 23 वर्षांपासून संगीत मैफलीचे आयोजन केल्या जाते.
यावर्षी दिनांक 21 रोजी “वसंत बहर” या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.वसंत बापट, वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंतराव देशपांडे. महाराष्ट्राची रंगभूमी, सिनेसृष्टी ,आणि भावगीत गाजवणाऱ्या या पाच वसंतांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम “वसंत बहर” हा पार पडला. स्वराश्री पुणे निर्मित या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर, योगिता गोडबोले, ऋषिकेश बडवे या गायकांनी गायन सादर केले. पराग माटेगावकर यांनी निवेदन केले.
पहाटेच्या भूपाळी पासून या काव्य मैफिलीला सुरुवात झाली, संसाराचा गाडा बाळ गोपाळांची आगीनगाडी, प्रेमी युगुलांचं प्रेम आणि नाट्य रसिकांसाठी नाट्यपदांच्या गायनाने कानसेनांना खिळवून ठेवले होते. अशा कार्यक्रमात लावणी झाली नाही तर नवलच ,लावणी देखील प्रेक्षकांच्या शिट्ट्या घेऊन गेली.–
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com