वैभव संपन्न नाट्यसृष्टीकडे प्रेक्षक वळतील का? अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिले” हे” उत्तर
जालना- सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात हातात टीव्ही आला आहे, त्यामुळे प्रेक्षक नाट्यसृष्टीकडे वळेल असे वाटत नाही. असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले .
दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेते सयाजी शिंदे हे जालन्यात रत्नदीप सिनेमांमध्ये “घर बंदूक बिर्याणी” या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनासाठी आले होते.
एक दिग्दर्शक आणि एक अभिनेता म्हटलं की गर्दी तर होणारच! अशा गर्दीमध्ये वैभव संपन्न असलेल्या संगीत नाट्य आणि एकंदरीतच जुन्या नाटकांचा जमाना परत येईल का? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेते शिंदे म्हणाले की ,”आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या हातात टीव्ही आला आहे. नवीन मुलं या नाट्य क्षेत्राकडे वळण्यासाठी तयार नाहीत आणि तेवढा वेळही आता कोणाला नाही. नाटकासाठी सराव करणे बारा- बारा घंटे खर्ची घालणे हे आता शक्य होत नाही. त्यामुळे नाटक क्षेत्राला पूर्वीचे दिवस येतील असे वाटत नाही. याचा अर्थ असा नाही की , सोशल मीडियाचा हा दुष्परिणाम आहे, परंतु ज्याला जे घ्यायचे त्याने ते घ्यावे ,आणि सकारात सकारात्मक घ्यावे” असेही ते म्हणाले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com