“त्याच्यातलं” मला काही कळत नाही-नागराज मंजुळे
जालना- प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आता कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.” घर बंदूक बिर्याणी” हा दिनांक सात रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे हे काल दिनांक 22 रोजी जालन्यात आले होते.
रत्नदीप सिनेमांमध्ये दिनांक सात पासून” घर बंदूक बिर्याणी” चित्रपट सुरू होत आहे. यावेळी Edtv News ने नागराज मंजुळे यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, आणि चित्रपटाचे कथानक नेमकं काय आहे? हे विचारले परंतु त्यांनी कथानका विषयी एक शब्दही न सांगता कमीत कमी ट्रेलर तरी पहा असे आवाहन केले. भविष्यात राजकारणावर चित्रपट बनवण्याचा मानस आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर “तूर्तास तरी असं काही आपल्या मनात नाही आणि त्याच्यातला आपल्याला काही कळतही नाही”. असेही ते म्हणाले. रत्नदीप सिनेमाच्या वतीने विनोद अग्रवाल, निखिल अग्रवाल अखिल अग्रवाल, रत्नदीप सिनेमाचे जगदीश अग्रवाल ,नीलम सिनेप्लेक्स चे शरद जैस्वाल, शेखर जैस्वाल, यांच्यासह रत्नदीप सिनेमाचे कर्मचारी अकबर भाई ,मोहसीन, संजय भुरेवाल,बाबा ,श्री कुलकर्णी, यांच्यासह संगीता खिल्लारे ,लिनाबाई आणि कॉन्ट्रॅक्टर सत्तार भाई आदींची उपस्थिती होती.——/
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com