Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

श्रीराम मंदिरात यावर्षी पासून नवीन प्रथा :भाविकांना मिळतोय श्रीरामांचा पदस्पर्श

जालना -श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या शुभहस्ते स्थापन झालेल्या श्रीराम मूर्तींच्या मंदिरात यावर्षीपासून पालखी मिरवणुकीची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे आता भाविक भक्तांना श्रीरामांचा पदस्पर्श होऊ शकेल.

जालना शहरात रेल्वे स्थानक भागांमध्ये 128 वर्षांपूर्वीचे पुरातन श्रीराम मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी स्वतः येथील श्रीराम मूर्तींची स्थापना केलेली आहे. त्यामुळे इथे एका वेगळ्या चैतन्याचा आभास इथे होतो,आणि म्हणून प्रत्येक भाविकाला श्रीरामांच्या मूर्तीला स्पर्श करण्याची इच्छा होते .परंतु या मूर्ती फक्त रामनवमीलाच मंदिराच्या बाहेर येत होत्या आणि त्यांना पदस्पर्शाचा भाविकांना लाभ मिळत होता. दोन वर्षांपूर्वी या मंदिराला 125 वर्षे पूर्ण झाले आणि त्याच वेळी या मूर्तींच्या मिरवणुकीचा निर्णय घेण्यात आला. परंतु कोविड मुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षीपासून रोज संध्याकाळी उपासनेनंतर साडेसात ते साडेआठ या एक तासांमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात येत आहे. ही नवीन प्रथा यावर्षीपासून सुरू झाली असल्याची माहिती, श्रीराम मंदिराचे विश्वस्त रामदास महाराज आचार्य यांनी दिली आहे. मिरवणुकी दरम्यान महिलांच्या
पावल्या, भाविकांचे भजन, रिंगण ,फुगडी अशा विविध प्रकारच्या आनंदोत्सवातून या मिरवणुकीचा समारोप होतो. त्यानंतर रामरायाची दृष्टही काढले जाते .अशा प्रकारच्या या प्रथेमुळे भाविकांची रामरायाला स्पर्श करण्याची इच्छा पूर्ण होऊन एक वेगळीच अनुभूती मिळते. असा विश्वासही रामदास महाराजाचार्य यांनी व्यक्त केला आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button