Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

युवती मेळाव्यात धर्म, शिक्षण आणि परिस्थितीची सांगड घालण्याचा प्रयत्न

जालना-सुख शांती समाधान पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या धर्माकडेच वळावे लागेल .असे मत सनातनच्या सौ. सुवर्ण निकम यांनी व्यक्त केले .”एक दिवस माझ्यासाठी, माझ्या कुटुंबातील सर्वांसाठी” या मोहिमेअंतर्गत कचेरी रोडवर असलेल्या श्री. बालाजी मंदिरात नुकताच युवती मेळावा संपन्न झाला .या मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सखुबाई राठोड, शिक्षिका सौ. मनीषा पाटील,श्री.सुनील जोशी यांची उपस्थिती होती.मेळाव्याचे उद्घघाटन आर. आर जोशी, दिलीप देशपांडे, नंदकुमार देशपांडे रघुनाथ खरात व युवती यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व गुरुस्तवनाने सुरुवात करण्यात  आले.

सुखी समाधानी आणि कर्तुत्वान होण्यासाठी धर्म शिक्षण आणि परिवार याची सांगड किती आवश्यक आहे हे युवतींना लक्षात यावे आणि त्यांनी योग्य दिशेने वाटचाल करावी या हेतूने या युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सौ. सुवर्ण निकम यांनी महिलांच्या जीवनात धर्माचे आणि संस्कृतीचे असलेले स्थान विशद केले. त्यासोबत महिला मुलांना छत्रपती शिवराय, श्रीराम, झाशीची राणी ,मा जिजाऊ, कृष्ण सुदामा ,यांच्या कथा न सांगता हातात मोबाईल देऊन टॉम अँड जेरी, मिकी माऊस, डोरेमॉन ,नोबिता,या कथा जर दाखवत असतील तर दोष द्यायचा कोणाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  महिलांचा शृंगार,त्याचा अर्थ आणि एकंदरीतच त्यांच्या दाग दागिन्यांचे फायदे देखील किती महत्त्वाचे आहे हे देखील त्यांनी विशद करून सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राठोड म्हणाल्या, की कर्तृत्ववान होण्यासाठी परिस्थिती कशी आहे हे महत्त्वाचे नाही तर आहे त्या परिस्थितीत तुम्ही पुढे कसे जाता हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे श्रीमंती, गरिबी या गोष्टी आपल्या ध्येयाच्या आड न येऊ देता आलेल्या संकटांवर मात करून ध्येय गाठता येते .असेही त्या म्हणाल्या .दरम्यान शिक्षिका सौ. मनीषा पाटील म्हणाला की ,युवतींनी छंद निश्चित जोपासावेत मात्र हे छंद परिवारात माहीत असावेत आणि या छंदातून काही ना काही आत्मसात करता यायला हवे. विशेष करून लिखाण आणि वाचन हे दोन्ही छंद आपल्याला ज्ञानच देतात. त्यामुळे अशा छंदाकडे तरुणींनी वळावे असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक संजय देशपांडे ,सुत्र संचालन सिमा सरपोतदार, आभार प्रतीभा खाडे यांनी मानले. स्वागत गीत सौ. सारिका सहस्त्रबुद्धे यांनी गायले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत वाघमारे, शशिकांत दाभाडकर, विधीज्ञ विनोद कुलकर्णी, सुबोध किनगावकर ,अमोल मोहरीर, सुमीत खाडे, सौ. विशाखा नाईक, आनंदी अय्यर,अपर्णा राजे, वैशाली बोंद्रे. वैशाली देशमुख ,सरोज दाभाडकर, प्रांजल देशपांडे, यांनी परिश्रम घेतले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button