Advertisment
बाल विश्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आठ तारखेपासून आयोजन

जालना- गेल्या 45 वर्षांची परंपरा कायम ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे 46 पुष्प 12 तारखेपासून गुंफण्यात येणार आहे. ही व्याख्यानमाला पाच दिवस चालणार आहे. या संदर्भात आयोजकांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामणे, सचिव राजेश राऊत, यांच्यासह एड .ब्रह्मानंद चव्हाण, सुधाकर रत्नपारखे, महेंद्ररत्न पारखे, सुरेश खंडागळे, लिंबाजी वाहुळकर, संजय इंगळे, आदींची उपस्थिती होती.

*असे आहेत कार्यक्रम*
दिनांक आठ रोजी पहिले पुष्प जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीचे प्राध्यापक डॉ. मिलिंद एकनाथ आव्हाड हे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संकल्पनात्मक लिखाण” यावर गुंफणार आहेत. दुसरे पुष्प सोलापूर येथील गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दिपाली काळे या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि वर्तमान प्रासंगिकता” यावर गुंफणार आहेत. तिसरे पुष्प कळवा विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेंद्र आव्हाड हे “वाढती असहिष्णुता आणि भारतीय लोकशाही” यावर आपले विचार मांडणार आहेत. चौथ्या पुष्पा मध्ये युवा व्याख्याते व प्रबोधनकार गणेश शिंदे हे “जीवन सुंदर आहे” यावर आपले विचार मांडतील. पाचव्या पुष्पामध्ये नागपूर येथील प्रा. जावेद पाशा हे “संविधान विरोधी शक्तीची हल्ले आणि लोकशाही समोरील आव्हाने” यावर बोलणार आहेत. पाच दिवस अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी सात वाजता अंबड चौफुली जवळ असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर हे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान दिनांक 13 एप्रिल रोजी बुद्ध- भीम गीतांचा आणि दिनांक आठ एप्रिल रोजी शाहीर प्रकाश कातुरे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच ते सात वाजे दरम्यान याच मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये तीन ठराव पारित केला जाणार आहेत त्यामध्ये.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला संविधान भवन उभारणे. आरक्षणाचे जनक राज्यश्री शाहू महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा उभारणे. मंगल कार्यालय उभारणे.याचा समावेश आहे.—

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button